एफएक्यू
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
१) एमटीएनएलची ब्लॅकबेरी सेवा काय आहे ?
एमटीएनएलची ब्लॅकबेरी सेवा, मोबाईल धारक व्यावसायिक जे नेहमी दौ-यावर बाहेर असतात त्यांच्यासाठी लोकांशी सम्पर्क साधणे व आवश्यक माहिती मिळवणे याकरिता सुरक्षित वायरलेस सेवा आहे. ही सेवा ग्राहकांना त्यांच्या संपूर्ण व्यावसायाशी निगडित माहिती मिळविणे, ई-मेल, फोन, एसएमएस, एमएमएस, ब्राउजर, ऑर्गनायजर, इन्स्टंट मेसेंजर, सोशल नेटवर्कींग इ॰ सुविधा, एकाच ब्लॅकबेरी स्मार्ट फोन वर उपलब्ध करुन देते.
२) एमटीएनएलची ब्लॅकबेरी सेवा प्राप्त करण्यासाठी काय करावे ?
प्रीपेड ब्लॅकबेरी सेवेसाठी संदेशाद्वारे आणि पोस्टपेड ब्लॅकबेरी सेवेसाठी आपल्या जवळच्या एमटीएनएलच्या ग्राहक केंद्रास १५०३ वर संपर्क करा.
३) ब्लॅकबेरी सेवा देणा-या अन्य कंपनीपेक्षा एमटीएनएलची ब्लॅकबेरी सेवा वेगळी कशी आहे ?
ब्लॅकबेरी सेवा 'पुश मेल' तंत्रज्ञानावर आधारीत आहे. तुमचा ई-मेल 'ई-मेल सर्व्हर' आल्यानंतर तुमच्या ब्लॅकबेरी स्मार्टफोन वर आपोअपच पुश केला जातो. हा ई-मेल पाहण्यासाठी ब्राउजिंग व डाऊनलोडींग करण्याची आवश्यकता नाही.
४) ब्लॅकबेरी स्मार्टफोनसाठी वेगळ्या सीमचा उपयोग करावा लागतो का ?
नाही, आपण या सेवेचा उपयोग करण्याकरीता आपले सध्याचे सिम किंवा युसिम कार्डचा वापर करु शकता॰
५) एमटीएनएलची ब्लॅकबेरी सुविधा प्राप्त करण्यासाठी आपणाकडे कोणत्या गोष्टिंची / बाबींची आवश्यकता आहे ?
आपणाकडे फक्त एमटीएनएलचे प्री-पेड किंवा पोस्टपेड कनेक्शन व ब्लॅकबेरी स्मार्टफोन असणे आवश्यक आहे.
६) मी बाजारातून ब्लॅकबेरी स्मार्टफोन करु शकतो का ? एम टी एन एल कोणता ब्लॅकबेरी स्मार्टफोन देते ?
होय, आपण बाजारामधून कोणताही 'नेटवर्क अनलॉक्ड ब्लॅकबेरी स्मार्टफोन' खरेदी करु शकता. एमटीएनेलकडून पुढील प्रकारचे स्मार्टफोन अतिशय कमी किमतीत वितरीत केले जातात. ब्लॅकबेरी बोल्ड ९००० (३जी), ब्लॅकबेरी ८७०० जी, ब्लॅकबेरी कर्व्ह ८३१० (जीपीएस)
७) एमटीएनएलची ही सेवा ब्लॅकबेरीशी अनुरुप ( कॉम्पॅटीबल) उपकरणावर (फोनवर) कार्य करु शकते का ?
होय, करु शकेल.
८) एमटीएनएलची ही सेवा अनलॉक्ड ब्लॅकबेरी स्मार्ट फोनवर काम करेल का ?
होय, करु शकेल.
९) या सेवेचे मूल्य किती रुपए आहे व यासाठी कोणते प्लॅन उपलब्ध आहेत ?
एमटीएनएलच्या संकेत स्थळावर उपलब्ध असणारा मूल्य तक्ता पहा.
१०) ब्लॅकबेरी स्मार्ट पोन द्वारा चॅटींग, ई-मेल एक्सेससाठी वेगळे मूल्य घेतले जाते का ?
नाही. आपण निवड केलेल्या ब्लॅकबेरी प्लॅननुसार मूल्य घेतले जाईल.
११) एकाच ब्लॅकबेरी स्मार्ट फोन वर इंटरप्राईज (बीईएस) सेवा आणि इंटरनेट सेवा (बीआयएस) या दोन्ही सेवेचा उपयोग करु शकतो का ?
होय.
१२) या सेवेमध्ये कोणत्या प्रकारचे ई-मेल अकाउंट आहेत ?
एमटीएनएलच्या ब्लॅकबेरी सेवेमध्ये पुढीलप्रमाणे ई-मेल अकाउंट उपलब्ध आहे - बोल मेल / जी मेल / एमएसएन /हॉट मेल /याहू /रीडीफ /पीओपी ३/ आयएमएपी ४/ मायक्रोसॉफ्ट एक्सचेंज आणि लोटस डॉमीनो मेल अकाउंट॰
.१३) ब्लॅकबेरी इंटरनेट सर्विस (BIS) व ब्लॅकबेरी इंटरप्राईज सर्वर (BES) या दोन्ही मध्ये काय फरक आहे ?
ब्लॅकबेरी स्मार्ट फोन व कार्पोरेट मेल सर्वर यांमधील लिंक जोडण्यासाठी व तिचे संचलन (मॅनेज) करण्यासाठी ब्लॅकबेरी इंटरप्राईज सर्वर सेटअप उपलब्ध असणे आवश्यक आहे. सामान्य सेट अप च्या सहाय्याने इंटरनेट वर ई - मेल एक्सेस ची सुविधा उपलब्ध करून देणा-या सेवेला ब्लॅकबेरी इंटरनेट सर्विस म्हणतात॰
१४) ब्लॅकबेरी सेवेच्या सहाय्याने व्यक्तिगत मेल व व्यावसायिक मेल एकत्र (इंटीग्रेट) ठेवू शकतो का ?
होय, इंटरनेटवर आधारीत ई-मेल अकाउंट- उदा. बोल मेल, हॉट मेल, जी मेल, याहू इ॰ च्या बरोबर आपले व्यक्तीगत पीओपी३ / इंटरनेट सेवा प्रदानकर्ता (आयएसपी) ई-मेल अकाउंट ब्लॅकबेरी सेवेशी एकत्रित ठेवू शकतो.
१५) ब्लॅकबेरी इंटरनेट सेवेसाठी (बीआयएस) आम्हास नवीन ब्लॅकबेरी ई-मेल पता मिळू शकेल का ?
होय, आपणास मिळेल.
१६) पिन काय आहे ? माझ्या ब्लॅकबेरी स्मार्ट फोनसाठी पिन कोठे मिळेल ?
आपणास आपला पिन नंबर आपल्या स्मार्ट फोन वर खालीली ठिकाणी मिळू शकेल - होम स्क्रीन वर, पर्यायामध्ये (ऑप्शन) जा किंवा बॅटरी कव्हरच्या आतील बाजूस किंवा तुमच्या ब्लॅकबेरी स्मार्ट फोन बोंक्सवरील स्टीकर वर॰
१७) संदेशाचे वितरण (मॅसेज डिलीव्हरी) वेळेवर केले जाते का ?
होय, आपल्या ई-मेल सर्वरच्या इन बॉक्स मध्ये संदेश पोहोचल्यावर आपल्या ब्लॅकबेरी स्मार्ट फोन वर तत्काळ संदेश वितरीत केला जाईल.
१८) जर माझा ब्लॅकबेरी स्मार्टपोनची चोरी झाली अथवा हरविला तर करावे ?
एमटीएनएल ग्राहक सेवा केंद्रामध्ये १५०३ वर संपर्क करा.
१९) मी फिरती (रोमिंग) वर असताना मला ब्लॅकबेरीची सेवा मिळेल काय ?
होय, भारतामध्ये व संपूर्ण जगात कोठेही जीपीआरएस रोमिंग भागीदाराच्या (पार्टनर) सहाय्या मूळे ब्लॅकबेरीची सेवा मिळेल.
२०) ब्लॅकबेरी स्मार्टफोन द्वारा मेल पाठवताना ऑटो सिग्नेचर सेट करु शकतो का ?
होय, ब्लॅकबेरी इंटरनेट सेवे द्वारा आपलं व्यक्तीगत अकाऊंट बनवतांना ऑटो सिग्नेचर सेट करु शकाल.
२१) ब्लॅकबेरी इंटरनेट सेवे द्वारा मेल बनविण्यासाठी ऑटो रिप्लाय सेट केला जातो का ?
ब्लॅकबेरी इंटरनेट सेवे द्वारा आपल्या व्यक्तीगत खात्यावरील मेसेजसाठी आपण कार्यालयातून बाहेर आहात अशा प्रकारचा 'रिप्लाय' सेट करु शकता.
२२) या साठी कोणत्या प्रकारची अटॅचमेंट आवश्यक आहे ?
पुढील प्रकारचे अटॅचमेंट आवश्यक आहे : माईक्रोसॉफ्ट वर्ड / एक्सेल / पॉवरपॉईंट / पीडीएफ / जेपीईजी / बीएमपी / टीआयएफएफ
अधिक माहीतीसाठी www.blakberry.com वर भेट द्या॰
ग्राहक सेवा केंद्रामध्ये १५०३ वर संपर्क करा.