अकाऊंट कॉलिंग सेवा कार्ड
या सेवेमध्ये ग्राहक एमटीएनएल (मुंबई व दिल्ली) मधिल नेटवर्कमध्ये कोणत्याही एसटीडी सेवा रहित फोनवरुन कोठेही स्थानिक, देशी आंतरराष्ट्रीय फोन कॉल करु शकतात.
या सेवेची वैशिष्ट्ये व सुविधा
अकाऊंट कार्ड कॉलिंग सेवा ही एक्सेस कोड १६०४२२ वर आधारित सेवा आहे. ग्राहकांनी एक्सेस कोड डायल केल्यानंतर ग्राहकांस अकाऊंट कार्ड क्रमांकावर असणा-या पिन नंबर प्रविष्ठी(Enter PIN No.) करावी. उपयोगकर्ता वैधते साठी अकाऊंट कार्ड क्रमांक व पिन क्रमांक डायल करेल व या नंबरावरुन ग्राहकांची ओळख प्रामाणिकतेची तपासणी झाल्यावर ग्राहकांनी गंतव्य क्रमांक डायल करावा. जर उपयोगकर्त्याच्या कार्ड अकाऊंट मध्ये पैसे शिल्लक असतील तरच ग्राहक कॉल करु शकेल.
डायल करण्याची पद्धत
डायल एक्सेस कोड - प्रथम १६०४२२ डायल करावा नंतर ८ अंकीय कोड क्रमांक नंतर ४ अंकीय पिन क्रमांक नंतर आपण ज्या नंबर वर फोन करणार आहात तो क्रमांक डायल करावा.
डायलींग प्लान - १६०४२२ xxxxxxxx-yyyy-zzzzzzzz
एक्सेस कोड - १६०४२२
कार्ड क्रमांक - xxxxxxxx (८ अंकीय)
पिन क्रमांक - yyyy ( ४ अंकीय)
गंतव्य क्रमांक - zzzzzzzzzz (२० अंकापेक्षा अधिक)
महत्वपूर्ण सूचना -
व्हीसीसी महत्वपूर्ण माहितीचा उल्लेख करावा. येथे क्लिक करा
ग्राहकांस मिळणारा फायदा
-
- स्वत:जवळ फोन कनेक्शन असणे आवश्यक नाही
- कोणत्याही टोन फोन वरुन कॉल केला जाऊ शकतो.
- कॉल करण्यासाठी रोख रक्कम घेऊन जाण्याची आवश्यकता नाही.
- या सेवेचा उपयोग करुन एक किंवा एकापेक्षा जास्त व्यक्तींना टेलिफोन केल्यानंतर, होणारा अंदाजे खर्च व खात्यावर शिल्लक असणारी रक्कम आपण पाहू शकता.
- या मध्ये कोणत्याही फोन वरुन एसटीडी/आयएसडी क्रमांक डायल करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
- हॉटेलमधून केल्या जाणा-या फोनच्या कॉल दरा पेक्षा या सेवेचे दर फार कमी आहेत म्हणून ही सेवा व्यवसाय करणा-या व्यक्ती प्रबंधन कार्य करणा-या व्यक्तीसाठी फार उपयोगी आहे.
- आपला खाते नंबर समान राहील व आपण आपल्या इच्छेनुसार प्रमाणित कोड बदलू शकता. ( फक्त एसीसी साठी)
- आपण केलेल्या स्थानिक/एसटीडी/आयएसडी कॉलच्या बिलाचे रेकॉर्ड उपलब्ध असेल.
- सुरक्षा ठेव परत घेता येते. {tab=मूल्य |teal}
कार्ड धारकाच्या खात्यामधून फक्त कॉलचे मूल्य घेतले जाईल. ज्या लाईनवरुन कॉल केला असेल त्या लाईनचा व ज्या लाईन वर कॉल केला आहे त्याचा आपसामध्ये काही संबंध नाही. अकाऊंट कार्डसाठी कोणत्याही प्रकारचे बिल बनवले जाणार नाही.