ब्रॉडबँड प्रि-पेड वोउचर 

  एमटीएनएलने  , आपल्या ग्राहकांसाठी प्रि-पेड ब्रॉडबँड सेवा  दिलेली  आहे . हि सेवा  ग्राहकांकडे पूर्वीपासूनच असलेल्या (वर्तमान) लँडलाईन वर दिली जाते.    

 

प्रि-पेड  ब्रॉडबँड पावती ( वाऊचर ) 

प्लॅनवाऊचर एमआरपी      वेग  निशुल्क उपयोग वैधता कालावधी
प्रि-पेड वाऊचर ४९९ रु. ४९९ २ एमबीपीएस पर्यंत १.३ जीबी १ महिना
प्रि-पेड वाऊचर १४९९ रु. १४९९ २ एमबीपीएस पर्यंत ५ जीबी ३ महिना
प्रि-पेड वाऊचर ३९९९ रु. ३९९९ २ एमबीपीएस पर्यंत १५ जीबी १ वर्ष
प्रि-पेड वाऊचर ५९९९ रु. ५९९९ २ एमबीपीएस पर्यंत २५ जीबी १ वर्ष

 

  • वरील सर्व वाऊचरसाठी सवलतीचा कालावधी ३० दिवस असेल.  सवलतीच्या कालावधी नंतर खाते तात्पुरते बंद केले जाईल आणि ३ महिन्यानंतर ते निष्क्रिय केले जाईल.
  • दुस-या वाऊचर योजनेमध्ये परिवर्तन( मायग्रेशन ऑफ  प्लॅन ) करण्यासाठी अनुमती दिली जाणार नाही.

 

प्रारंभिक  मूल्य  (फक्त एकदा)
संस्थापन व एक्टीवेशन रु. ३००
मॉडेम प्रभार  ( चार्जेस )
सामान्य मॉडेम रु. १०००
वायरलेस मॉडेम रु. १७००

 

प्रक्रिया 
 

     १. ग्राहक, आपल्या वर्तमान टेलिफोन लाईनवरुन प्रि-पेड ब्रॉडबँड कनेक्शनची नोंदणी करु शकतो.      
      २. प्रि-पेड ब्रॉडबँड कनेक्शनची नोंदणी, ग्राहक सेवा केंद्राच्या काऊंटरवर किंवा १५०० नंबरवर संपर्क साधून केली जाऊ शकते.          
      ३. प्रि-पेड ब्रॉडबँड नोंदणी, सक्रियकरण व मॉडेम शुल्काची रक्कम पहिल्या बिलातून वसूल केली जाईल.           
     ४. प्रि-पेड ब्रॉडबँडचा कार्यादेश पोस्टपेड कनेक्शनच्या प्रक्रियेप्रमाणे पूर्ण केला जाईल.       
     ५. ग्राहकाला ५० एमबी डाऊनलोडची ब्रॉडबँड योजना  (प्लॅन) दिली जाईल.  जिचा वैधता कालावधी ९० दिवस असेल.  वैधता अवधीमध्ये   ग्राहकाला आपले खाते उपलब्ध वाऊचरमधुनच रिचार्ज करावे लागेल.            
     ६. रिचार्ज करण्यासाठी http://register.mtnl.net.in वर जा.      
     ७ .रिचार्जींग प्रक्रियेमध्ये कोणतीही समस्या आल्यास ग्राहक, आमच्या कॉल सेंटर नं. १२५४३ वर किंवा १५०४ चा विकल्प ३ वर संपर्क  करु शकतात.          
     ८ . एक ईमेल आयडी ( ४ एमबी इनबॉक्स साईज) नि:शुल्क दिला जाईल.        
     ९ . वाऊचरच्या वैधता कालावधीच्या समाप्तीनंतर, शिल्लक डाऊनलोडचा  वापर  पुढील कालावधीसाठी करता येणार नाही.      
     १०.  वैधता कालावधी समाप्तीच्या पुर्वी संपूर्ण डाऊनलोडचा वापर  केल्यास ग्राहकांना वरील उपलब्ध वाउचरच्या सहाय्याने पुन्हा  रिचार्ज करावे लागेल.      
     ११. वैधता कालावधी समाप्ती पुर्वी जर ग्राहकाने उपलब्ध अन्य वाऊचरच्या सहाय्याने रिचार्ज केले तर त्यावेळेस खात्यावरील शिल्लक  डाऊनलोडचा  नव्या रिचार्ज  वाऊचर मध्ये मिळविली जाईल. परंतु बाकी कालावधीचा वापर पुढे    
         करता येणार नाही.      
     १२. प्रत्येक वाउचरचा वैधता कालावधी  समाप्त झाल्यावर एक महीना सवलतीचा कालावधी दिला जाईल. ग्राहकाने  सवलतीच्या   कालावधीत रिचार्ज  न केल्यास  त्याचे खाते स्थगित केले जाईल. खात्याचा वैधता कालावधी संपल्यावर
         ९० दिवसांनंतर खाते   कायमस्वरुपी बंद करण्यात येईल.      

     १३. सद्य स्थितीत पोस्टपेड योजनेतून  प्रि-पेड योजनेमध्ये  परिवर्तन  करण्यास अनुमती नाही.      
     १४.    सेवे  संबंधित तक्रारींसाठी ग्राहक १९८ डायल करु शकतात.        
    १५ . ग्राहक, आपल्या शिल्लक डाउनलोड व वापराची  माहिती http://register.mtnl.net.in वर लॉगिन करुन पाहू शकतात.