लँडलाईन फोन प्लस सुविधा   


आपल्या लँडलाईन फोनवर फोन प्लस सुविधा घेऊन आपण अधिक सुविधा प्राप्त करु शकता.  कॉल आपण फॉरवर्ड किंवा हॉटलाईन करु शकता.  जावक कॉल बंद करु शकता किंवा आपणास महत्वपूर्ण कामाची आठवण करण्यासाठी या सुविधेचा वापर करा.  केवळ दोन अंकी नंबर डायल करुन ही सुविधा प्राप्त केली जाते.  फोन प्लस सेवेच्या मदतीने तुम्ही लँडलाईन द्वारा माहिती घ्याल.  एक गोष्ट सांगायस आम्ही विसरलों की फोन प्लस हि सुविधा मोफत आहे या सेवेसाठी कोणतेही शुल्क घेतले जात नाही.

 

एक्टिव ऑनलाइन 


 


 


alt


 


इलेक्ट्रॉनिक डायनेमिक लॉक

डायनामिक लॉकींग सुविधेचा उपयोग करुन आपण टेलिफोनचा होणारा दुरुपयोग रोखू शकतो.  यामुळे आपल्या टेलिफोनवरुन अनधिकृत कॉल केले जाणार नाहीत.  ही सेवा पूर्णतः  सुरक्षित आहे.  या सेवेचा उपयोग करुन आपण आपल्या टेलिफोन वरुन केल्या जाणा-या कॉल्सना बंद करु शकता.                   

              ग्राहकांनी ० ते ९ पर्यंतच्या अंकामधून ४ अंकाचा गुप्त कोडची निवड करुन ही सेवा प्राप्त करू शकतात.  याचे पंजीकरण एक्सचेंज मध्ये केले जाते.   या चार अंकी गुप्त कोडचा उपयोग आपल्या टेलिफोन वरील डायनॅमिक लॉकला चालू करणे व बंद करण्यासाठी केला जातो.  आवश्यकता असेल तर आपण हा गुप्त कोड वरचेवर बदलू शकता.        

अन्य पर्याय 

  • सर्व जावक (आऊटगोईंग)  कॉल करण्याची अनुमती आहे. 
  • केवल स्थानिक जावक (आऊटगोईंग) कॉल करण्याची अनुमति आहे. 
  • केवल एसटीडी व स्थानिक जावक (आऊटगोईंग) 
  • कॉल करण्याची अनुमति आहे. 
  • सर्व जावक (आऊटगोईंग) कॉल बंद केले जातील.                                                                                                                      

        आपला गुप्त कोड पंजीकृत करा. 

कोड पंजीकृत करण्यासाठी डायल करा १२३ एबीसीडी एबीसीडी
  १२३ एबीसीडी इएफजीएच
  • एबीसीडी : जुना गुप्त कोड
  •  इएफजीएच  : नवीन गुप्त कोड 

गुप्त कोडची निवड करण्याची पध्दत  

उदाहरण (Senario)एक्सेस कोडगुप्त कोडविकल्प
सर्व कॉल करु शकता १२४ एबीसीडी
फक्त स्थानिक कॉल करु शकता  १२४ एबीसीडी
स्थानिक, महाराष्ट्र परिमंडळ व  एसटीडीसाठी १२४ एबीसीडी
सर्व जावक कॉल बंद १२४ एबीसीडी

ही सेवा कार्यान्वित करण्यासाठी ग्राहक केंद्रामध्ये अर्ज करा किंवा १५०० या टोल फ्री नंबरवर कॉल करा. 

क्लिप

 या सुविधे मध्ये आपणास जी व्यक्ति कॉल करत आहे, त्याचा नंबर तुम्ही पाहू शकता व आपल्याशी संबंधित कॉल नसेल, तर त्याला रोखू शकता.  मोफत दिल्या जाणा-या या सेवेचा लाभ घ्यायचा किंवा नाही हे आपणावर अवलंबून आहे.  या सेवेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांस क्लिप सुविधा युक्त फोनची खरेदी करावी लागेल.

ही सुविधा घेण्यासाठी अर्ज कुठे करावा.   

क्लिप सुविधा प्राप्त करण्यासाठी ग्राहकांनी जवळच्या ग्राहक केंद्रामध्ये आपला अर्ज जमा करावा किंवा १५०० टोल फ्री फोनवर कॉल करावा.      

कॉल फॉरर्व्डींग्

या सुविधेच्या मदतीने जेव्हा ग्राहक येणारा कॉल घेण्यासाठी आपल्या कार्यालयात / घरी उपस्थित नसेल तेव्हा येणारा आवक कॉल ग्राहकांच्या दुस-या टेलिफोन वरती जोडू शकता किंवा पाठवू शकता.  ही सुविधा घेतल्यानंतर आपण कार्यालयातून किंवा घरातुन बाहेर गेला असाल तर आपणास येणारे सर्व कॉल प्राप्त होतील.  

                 ही सुविधा प्राप्त करणेसाठी जवळच्या ग्राहक सेवा केंद्रास अर्ज करा किंवा १५०० या टोल फ्री नंबर वर कॉल करा.

  ही सुविधा कार्यान्वित करणेची पध्दत. 

                एक वेळ ही सुविधा पंजीकृत केल्यावर ग्राहक ११४ नंबरच्या बरोबर तुम्ही ज्या नंबर वर आवक कॉल हस्तांतरीत / बदली करु

            ईच्छिता तो नंबर ११४ xxxxxx या प्रकारे डायल करुन, ही सेवा प्राप्त करु शकता ( ११४= कोड संकेत +  xxxxxxxx टेलिफोन नंबर) 

   ही सेवा बंद करण्यासाठी:  ग्राहकांनी ११५ डायल करावा.

कॉल रिमाइडर

या सुविधे मध्ये ग्राहकांस आपल्या पूर्व निर्धारीत वेळेत झोपेतून उठण्यासाठी मदत होते.  या साठी टेलिफोन ग्राहक आपल्या ठरलेल्या वेळी एक्सचेंजमधून स्वयंचलीत फिक्स कॉल प्राप्त करतो.  आपण सांगितलेल्या वेळी आपणास झोपेतुन जागे करण्यासाठी आवक स्मरण काल मिळेल.       

कॉल रजिस्टर करण्याची पध्दत :

उदा. जर तुम्हास सकाळी १०.१५ वाजता स्मरण करण्याची आवश्यकता आहे तेव्हा आपण ११६१०१५ डायल करा  व प्राप्ती घोषणेची प्रतीक्षा करा.  आपणास आपली वेळ निर्धारीत केल्याची सूचना मिळेल.  त्याप्रमाणे जर आपणास दुपारी ४.३० वाजताचे स्मरण करण्याची आवश्यकता आहे तेव्हा आपण ११६१६३० डायल करा व सूचना प्राप्ती घोषणेची प्रतिक्षा करा.  आपणास आपली पंजीकृत केलेली स्मरण  वेळ रद्द करण्यासाठी ११७ १०१५ डायल करा. 

या सेवेसाठी प्रत्येक वेळी दोन कॉलचा प्रभार घेतला जाईल.                   

एब्रिव्हेटेड डायलिंग

  या सुविधेचा उपयोग करुन ग्राहक जर एका व्यक्तीस वारंवार फोन करत असेल तेव्हा स्वतःच्या सोयीनुसार त्या व्यक्तीच्या फोन नंबरसाठी दोन अंकी कोड बनवून ठेवु शकतो.   खासकरुन एनएसडी व आएसडी कॉल्स साठी ही सुविधा आहे.  ही अति जलद डायलींग सुविधा आहे.  या सुविधेच्या मदतीने ग्राहक वारंवार जर कॉल करत असेल तर त्या नंबरसाठी अशा प्रकारचा दोन अंकी कोड नं. बनवू शकतो. 

                     ही सुविधा कार्यान्वित करणेसाठी ११० एबी टेलिफोन क्रमांक डायल करा.

                     त्यानंतर त्या टेलिफोन क्रमांकावर कॉल करणेसाठी १११ एबी प्रेस करा.

  एबी : 2-डिजिट कोड

अर्ज कोठे करावा

            आवेदन अर्ज करायची आवश्यकता नाही ही सुविधा ग्राहकांना सुरवातीपासून उपलब्ध केली आहे.        

हॉटलाइन

 

  हॉटलाईनची सुविधा ही ग्राहकांसाठी फार लाभदायक आहे.  या सेवेमध्ये वारंवार केल्या जाणा-या कॉलचा पूर्ण नंबर डायल

करण्याची आवश्यकता नाही.   ही सुविधा वृध्द आई-वडील, नातेवाईक किंवा शाळेतून परत आलेल्या लहान मुलांसाठी ज्यांना पूर्ण नंबर आठवणीत ठेवणे किंवा पूर्ण नंबर डायल करणे अवघड आहे, अशांसाठी ही सुविधा लाभदायक आहे.

                 या सुविधेच्या मदती ने ग्राहक मुंबई किंवा मुंबई बाहेरच्या आपल्या आवडत्या नंबरवरुन नंबर डायल न करता या सेवेशी जोडले जातात.  ग्राहकांनी फक्त आपला रिसिव्हर उचलावा.  ५ मिनिट प्रतीक्षा करावी, ते आपोआर हॉटलाईन नंबरशी जोडले जातील.  

                  हॉटलाईन नंबरच्या अतिरीक्त कुणा अन्य व्यक्तीला कॉल करण्यासाठी डायल टोन मिळाल्यावर ५ सेकंदाच्या आत क्रमांक डायल करा.  

कॉल शुल्क  

                 हॉटलाईनशी नंबर जोडल्यावर साधारण कॉलचे शुल्क घेतल जाईल (स्थानिक, एनएसडी, आएसडी नुसार)

अर्ज कुठे करावा 

                   अर्ज जवळच्या ग्राहक केंद्रावर जमा करावा किंवा १५०० (टोल फ्री) नंबर  डायर करा.

दोन ग्राहकांमध्ये आर सर्कीट द्वारा हॉटलाईन जोडणे आहे   

१)  ग्राहकांना आपापसात  वार्तालाप करण्यासाठी ही सुविधा तत्काल दिली जाते.  यामध्ये कितीही कॉल करण्याची परवानगी आहे.  या सेवेमध्ये इतर ग्राहकांना कॉल करण्याची परवानगी नाही.

                 या सेवेस आर ७ सर्कीट सेवा या नावाने ओळखतात.  ही सेवा प्राप्त करण्यासाठी इएन युनिट मध्ये अर्ज करावा.  तेथे आपल्या अर्जाचे पंजीकरण करुन कनेक्शन दिले जाईल व या कनेक्शनचे बिल ही इएन कार्यालयाकडुन पाठवले जाईल.

                   आर ५ सर्कीटसाठी समर्पित लिंकची व्यवस्था करुन तेथे उच्चतम लिंकची व्यवस्था निश्चित केली जाते.  याच्या विरुध्द सार्वजनिक डोमेन लिंक मधून दोन पॉईंटच्या मध्ये आर सर्कीट द्वारा कनेक्टीव्हीटी दिली जाते. 

२)  आर ७ सर्कीटचे बिल एमटीएनएलच्या इएन युनिट मार्फत पाठवले जाईल.  ही सुविधा कमीत कमी १ वर्षासाठी प्राप्त करण्याची सोय आहे.  ही सुविधा घेण्याच्या पूर्वी ग्राहकांनी १ वर्षाचे कमीत कमी अग्रिम भाडे जमा करणे आवश्यक आहे.  याच बरोबर एमटीएनएलच्या इएन युनिट कडून पाठवल्या जाणा-या अन्य सर्कीटच्या बिलाशी समांतर आर ७ सर्कीटचे बिल ग्राहकांनी केलेल्या निवेदनानुसार वार्षिक, सहामाही, तिमाही असू शकेल.

                       आर ७ सर्कीटचे मासिक भाडे प्रत्येक सीमेसाठी रु. २००+ टॅक्स आहे. (उदा. रु. २००x२+१२ टॅक) दोन्ही सीमासाठी एकूण संस्थापन मूल्य रु. ७० असेल.

३)  ग्राहकांनी लिखित अर्ज दिल्यावर जर ग्राहकांस आवश्यक असेल तर आर ५  सर्कीट मधून आर ७ सर्कीट वर बोलू शकतो.  यासाठी संस्थापन भाडे घेतले जाणार नाही.

कॉल हंटिंग

 

  जर ग्राहकांजवळ एकापेक्षा अधिक लाइन्स असतील तर त्या लाईनचा उपयोग करण्यासाठी कॉल हंटींगची सुविधा त्याला उपयोगी ठरेल.  ही सुविधा आपल्या आवक कॉलला आपोआप स्थानांतरीत करते.  ग्राहकास आपल्या व्हिजिटींग कार्ड किंवा व्यावसायिक  पत्रावर आपल्या कार्यालयाचे न्यूमरस अंक सांगण्याची आवश्यकता नाही, फक्त मुख्य अंक दाखवला किंवा छापला जाणे आवश्यक आहे.

                    कार्यालयीन नंबराच्या ग्रुपसाठी कॉल हंटींग सुविधा घेतल्यानंतर जर मुख्य नंबर डायल केला तर एक्सचेंज आपोआप त्या ग्रुपचा फ्री नंबर शोधेल व त्या नंबरवर आवक कॉल पाठवेल.

अर्ज कुठे करावा ?

जवळच्या ग्राहक केंद्रामध्ये किंवा १५०० टोल फ्री नंबर डायल करा. 

कॉल अलर्ट

कॉल अलर्ट सुविधे मध्ये जेव्हा ग्राहक दुस-या ग्राहकांशी टेलिफोनवर संभाषण  करत असेल तेव्हा दुस-या आवक कॉलची सूचना देते.  या सुविधेमध्ये ग्राहक प्रथम क्रमांकाशी संभाषण थांबवून दुस-याक्रमांकाचा कॉल घेऊ  शकतो.

 

सेवा कार्यान्वित करणे -    ही सेवा कार्यान्वित करण्यासाठी ११८ डायल करा.

 

सेवा बंद करणे -  ही सेवा बंद करण्यासाठी ११९ डायल करा.

 

अर्ज कुठे करा :  अर्ज करण्याची आवश्यकता नाही ही सुविधा ग्राहकांना सुरवातीला दिली गेली आहे.   

थ्री पार्टी कॉन्फरन्सिंग

थ्री पार्टी कॉन्फरन्सिंग  सेवा ही अशी सेवा आहे ज्यामध्ये आपणास एकाच वेळी दोन नंबर डायल करण्याची परवानगी देते.  यामध्ये तीन पक्षांना वार्तालाप करणे शक्य आहे.  उदा.  ज्या दोन पार्टीला आपण कॉल केला आहे त्या दोघांशी आपण एकाच वेळी बोलू शकता

 अर्ज कुठे करावा ? 

जवळच्या ग्राहक सेवा केंद्रामध्ये किंवा १५०० (टोल फ्री) क्रमांक डायल करावा.

 

 बुकिंग साथी व अधिक माहितीसाठी  ९८६९८८९९८८  या नंबर वर 'LL ' असा   एसएमएस करा