टेलीव्होटिंग सेवा
टेलीव्होटिंग सेवेचा उपयोग करुन ग्राहक टेलिफोनवरुन लोकांची मतें जाणून घेऊ शकतो व अवलोकन करु शकतो. जे लोक ओपीनियन पोलला प्रतिसाद प्रदर्शित करत आपले मत देऊ इच्छितात, ते दिलेल्या टेलीव्होटिंग नंबरच्या मदतीने आपले मत नोंदवू शकतात. या सेवेचा उपयोग करुन नेटवर्क प्रचालक टेलीव्होटिंग ग्राहकांस दोन अंकी तात्पुरता नंबर देईल. त्या नंबरास इच्छित संख्या म्हटले जाते. अधिकतर टेलीव्होटची स्वीकृति उद्घोषणेच्या माध्यमातून दिली जाते. याचबरोबर इच्छित स्थानामध्ये वाढ होते. या सेवेमध्ये निवड केलेल्या टेलिफोन ना एका सार्वजनिक नंबरशी जोडले जाते. मतदान संपल्यानंतर भाग घेणा-यांना निकाल दिला जातो.
सेवेची वैशिष्ट्ये
मूलभूत वैशिष्ट्ये
- समूह कॉलिंग
वैकल्पिक वैशिष्ठयं
- कॉल वाढविणे (विस्तार)
- समूह कॉलिंग
- मूल आधार संप्रेषण
- मूलजनित कॉल स्क्रीनिंग
- कॉल आधारीत संप्रेषण
मूल्य आकारणी
- नोंदणी मूल्य : रू. ३,०००/-
- सुरक्षा राशि प्रत्येक दिवसासाठी : रू. १०,०००/- प्रत्येक दिवसासाठी बँक गॅरेंटी
मूल्य आकारणी
टेलीव्होटिंग (श्रेणी - १)
जर टेलीव्होटिंग नं. हा नि:शुल्क नंबर असेल व टेलीव्होटिंग सेवेचा ग्राहक असेल व जर तो आवक व प्रतिक्षा कॉलचे बिल भरत असेल तर :
- प्रत्येक दिवशी ५ टेलीव्होटिंग साठी मूल्य (अग्रिम भरणा) रु. ५,०००,००
- प्रत्येक जादा टेलीव्होटिंग साठी प्रत्येक दिवसाचे मूल्य (अग्रिम भरणा) रु. १,०००,००
- ५००० टेलिफोन कॉल पर्यंतचे मूल्य (प्रत्येक कॉलचे मूल्य ) रु. १.००
- ५००० पेक्षा अधिक केल्या जाणा-या प्रति कॉलचे मूल्य रु. ०.८०
- सुरक्षा ठेव प्रत्येक दिवसासाठी रु. १०.०००.००
- बँक गारंटी प्रत्येक दिवसासाठी रु. १०.०००.००
श्रेणी-१ साठी एक्सेस पध्दती
डायलिंग प्लान : १६०३ २२XXXX
एक्सेस कोड : १६०३, टेलीव्होटिंग - XXXX ( ग्राहकाने निवड केलेल्या शेटवटच्या दोन अंका सोबतचे ४ डिजिट्स )
टेलीव्होटिंग (श्रेणी - २)
जेव्हा टेलीव्होटिंग सेवेचा वर्गणीदार टेलिफोनचे मूल्य भरत नाही व कॉल करणारी पार्टी टेलीव्होटिंग मध्ये भाग घेण्यासाठी पैसे भरते तेव्हा
- प्रत्येक दिवसांकरीता ५ टेलीव्होटिंग पर्यंतचे मूल्य (आगाऊ भरणे) रु. १०.०००.००
- अतिरीक्त टेलिफोन साठी प्रत्येक दिवसाचे मूल्य (आगाऊ भरणे) रु. १.०००.००
श्रेणी-२ साठी एक्सेस प्रक्रिया
डायलिंग प्लान : १९०२ २२ XXXX
नोंद घ्या :
१. कमीत कमी ७ दिवसाचे मूल्य घेतले जाईल.
२. सर्व प्रकारच्या बिलांचा भरणा एमटीएनएल, मुंबईच्या नावे डिमांड ड्राफ्ट/बँकर चेक द्वारा करावा लागेल.
३. कोणत्याही अधिकृतप्राप्त बँकेच्या बँक गॅरटी मार्फत.
४. सर्व्हेचा प्रतिसाद पाहून आपली सेवा परत घेण्याचा अधिकार एमटीएनएल कडे राहील.
सेवा कोणत्या प्रकारे प्राप्त करु शकतो
संपर्क
सहाय्यक महाव्यवस्थापक (जनसंपर्क- एलसी): संपर्क नंबर : २२६३४०४५
जनसंपर्क अधिकारी (एलसी) : संपर्क नंबर:. २२६१६४११
पता:
सहाय्यक महाव्यवस्थापक (जनसंपर्क- एलसी)) चे कार्यालय
तळ मजला,फाउंटेन-१ टेलिकॉम बिल्डींग,
व्हीएसएनएल ( टाटा टेलिकॉम ) च्या जवळ
फाउंटेन मुंबई
तांत्रिक सहाय्यतेकरीता
संपर्क नंबर : १९०१-२२-६७६९ / उप व्यवस्थापक (एंटरप्राइज नेटवर्क) २४३२७००२/२४३८२४८६
तक्रार करण्यासाठी टोल फ्री नंबर डायल करा. : १८००२२१५००