मोबाइल इंटरनेट (जीपीआरएस)

 

एमटीएनएल जीपीआरएसची वैशिष्टे

 

  • आता आपल्या मोबाईल वर एमटीएनएल जीपीआरएसच्या बरोबर इंटरनेट प्राप्त करा.  एमटीएनएल मोबाईलच्या मदतीने सर्फ, मेल, चैट किंवा आपली आवडती वेबसाईट ब्राऊज  करा. 
  • एमटीएनएल मोबाईलच्या मदतीने आपल्या डेस्कटॉप / लॅपटॅप वर इंटरनेट एक्सेस करा.
  • एमटीएनएल वैबसाईट www.wap.mtnlmumbai.in वर वॉलपेपर डाऊनलोड करा.  एनिमेशन पोलीट्यून व प्रदर्शन कार्यविधीचा आनंद घ्या॰                                                                                                                             
  • एमटीएनएल जीपीआरएस कार्यान्वित कसे करतात ? 
  • एमटीएनएलच्या सर्व प्रीपेड ग्राहकांजवळ ३जी / जीपीआरसची सेवा अगोदरच कार्यान्वित केली आहे.
  • एमटीएनएल पोस्टपेड ग्राहक १५०३ (टोल फ्री) नंबर वर डायल करुन   किंवा एमटीएनएल ग्राहक केंद्रामधून किंवा  ५५५ (टोली फ्री) नंबर वर जीपीआरएस एसएमएस करुन हि सुविधा  प्राप्त करु शकतात. 
  • कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी कृपया आपल्या मोबाईल वरुन १५०३ (टोल फ्री) वर डायल करा.
Click here to receive GPRS / Mobile Tv settings from MTNL website.
जीपीआरएस पोस्टपेड मूल्य आकारणी (टॅरिफ)
उपयोगानुसार बिल

३ पैसे १ पैसा* / १० केबी (स्थानिक व रोमिंग)

जीपीआरएस योजना (प्लान ) १२० मासिक ठराविक भाड़े : रुपये १२०/- १ जीबी चा मोफत डाटा उपयोग करू शकता

जीपीआरएस योजना (प्लान ) १९९

मासिक ठराविक भाड़े : रुपये १९९/- ३ जीबी चा मोफत डाटा उपयोग करू शकता

  • मोफत डेटाचा वापर संपल्यानंतर , होम व रोमिंग नेटवर्क साठी ३ पैसे १ पैसा* /१० केबी  या दराने भाडे लागू.( *०१/१०/२०१७ पासून सुधारित डेटा शुल्क)
  • जेव्हा आपण होम नेटवर्कच्या बाहेर रोमिंग मध्ये असाल तेव्हा बीएसएनएल नेटवर्कची निवड करा.
  • मोफत डाटा वापर केवळ एमटीएनएल मुंबई व महाराष्ट्र आणि गोवा नेटवर्क वर उपलब्ध.
  • वरील भाडे करां व्यतिरिक्त आहेत.
  • कमीत कमी डाऊन लीड वेग २ जी करीता २० केबीपीएस व 3 जी करीता २५६  केबीपीएस असेल, जर डाटा सेवे करीता ब्राउसिग करीत असलेल्या ग्राहकाची संख्या , कमी कव्हरेज क्षेत्रग्राहक स्थान,पीक।आँफ वेळ, वापरात असलेले डीवाईस, अनुप्रयोग घेणारे डेटा, वबसाईट वर्तन आणि इतर बाह्य घटक प्रकार. .

 

 जीपीआरएसची मांडणी (सेटींग)

एमटीएनएल वेबसाईट वरुन किंवा कॉल सेंटरमधून किंवा मॅन्युअल पध्दतीनुसार  आपण आपल्या मोबाईल वर जीपीआरएसची मांडणी (सेटींग्ज)  प्राप्त करु शकता.    

एमटीएनएल वेबसाईटवरुन जीपीआरएस / मोबाईल टिव्ही सेटिंग्ज प्राप्त करण्यासाठी  येथे क्लिक करा 

 मोबाईलसाठी मॅन्युअल सेटिंग्ज

जोडणी (कनेक्शन) चे नाव

एमटीएनएल  जीपीआरएस

डेटा बेयरर 

पॅकेट डाटा

एक्सेस पॉईंटचे नाव  (APN)  

mtnl.net
युजरचे नाव

रिक्त सोडा

संकेतांक (पासवर्ड)

रिक्त सोडा

प्रमाणिकरण (ऑथेन्टीकेशन)

साधारण (नॉर्मल)

होम पेज http://wap.mtnl.in
प्रॉक्सी होय
प्रॉक्सी सर्वरचा पता १०.१०.१०.१०
पोर्ट ९४०१
  • जर आपण मोबाईल टिव्हीचा उपयोग करत नसाल तर प्रॉक्सीचा रकाना रिक्त सोडू शकता. 
  • उच्च स्मार्ट फोन साठी प्रॉक्सी कॉलम खाली सोडू शकता . 
  • सेटिंग अंमलात आणण्यासाठी ,  सेटिंग सेव केल्यावर मोबाइल  हॅंडसेट बंद करून पुन्हा चालू करणे .

 

  मोबाईलचा उपयोग करुन आपल्या पीसी वर युएसबी डाटा केबल / ब्ल्यु टूथच्या मदतीने इंटरनेट जोडणे.

  •  आपण मोबाईलचा उपयोग करुन जीपीआरएस ३जी शी आपला पीसी जोडू शकतो किंवा मोबाईलचा उपयोग करुन आपला लॅपटॉप यूएसबी डाटा केबल किंवा ब्लूटूथच्या द्वारा जोडू शकता.          
  • ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसाठी आपल्या लॅपटॅप मध्ये व मोबाईल मध्ये ब्लूटूथ असणे आवश्यक आहे.
  • आपल्या मोबाईल मध्ये जीपीआरएस किंवा ३जी कनेक्शन चालु असणे आवश्यक आहे.आपल्या मोबाईल मध्ये जीपीआरएस / ३जी सुविधा उपलब्ध असणे आवश्यक आहे.  
  • ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसाठी आपला टॅपटॉप व मोबाईल मध्ये ब्लूटूथ असणे आवश्यक आहे. 

 डाटा केबलचा वापरकरून मोबाईलशी पीसी जोडणे

आपला मोबाईल मोडमच्या स्वरुपात पीसी व संस्थापित

  • आपल्या डेस्कटॉप व लॅपटॉप वर आपल्या मोबाईलच्या ड्रायवर सॉफ्टवेअरची स्थापना करा. या पॉईंट वर आपला मोबाईल जोडु नका.  जेव्हा आपला ड्रायवर सॉफ्टवेअर स्थापित होईल.  यूएसबी केबलने आपला मोबाईल प्लग करुन चालू करा.  यानंतर आपण आपल्या सिस्टम मध्ये" found new hardware, Install in progress" पाहू शकता.  आपला पीसी सीडीच्या मदतीने आवश्यक मोडम ड्राईवर शोधून सिस्टममध्ये स्थापन करेल. आपल्या कम्प्यूटर वर हार्डवेयर उपयोगासाठी तयार आहे असे संकेत मिळेपर्यंत प्रतिक्षा करा. 
  • आता, 'स्टार्ट>सेटींग्ज> कंट्रोल पॅनेल>फोन्स आणि मॉडेम्स' मध्ये जा.
  • फोन व मॉडेम विंडो मधून 'मॉडेम' टॅब ची निवड करा.
  • स्थापित केलेल्या मॉडेमची निवड करा आणि 'प्रॉपर्टीज' वर क्लिक करा.
  • एडव्हान्स टॅबची निवड करा . आपल्या कनेक्शनच्या प्रकारानुसार अतिरीक्त प्रारंभिक आदेशाच्या अंतर्गत( स्ट्रॉ इनिशलायझेशन कमांड )दिलेली अक्षरे टाईप करा. 'एटी+सीजीडीसीओएनटी=१,"आयपी", "mtnl.net" ' .
  • आता 'ओके' वर क्लिक करा.  आपला मोबाईल मॉडेमच्या  रुपात यशस्वीपणे स्थापित झाला आहे.
  • आता इंटरनेटचा उपयोग  करण्यासाठी नवीन डायल अप जोडणी (कनेक्शन) निर्माण (क्रिएट) करा.

डायल कनेक्शनची मांडणी (सेटींग) करण्यासाठी

  • कंट्रोल पॅनेल>नेटवर्क कनेक्शन'  वर जा.
  • 'क्रिएट न्यू कनेक्शन' वर क्लिक करा.
  • ' न्यू कनेक्शन विझार्ड' वर क्लिक करा.
  • 'कनेक्ट टू इंटर नेट' ह्या विकल्पची निवड करून नेक्स्ट बटणावर क्लिक करा.
  • आता ' सेट अप माय कनेक्शन मॅन्यूअली ' ची निवड करुन नेक्स्ट बटणावर क्लिक करा.
  • 'कनेक्ट युजिंग डायल अप कनेक्शन'  ची निवड करुन नेक्स्ट बटणावर क्लिक करा.
  • आता मांडणी (कॉन्फिगर्ड)  केलेल्या मॉडेमची निवड करुन नेक्स्ट बटणावर क्लिक करा.
  • आयएसपीचे नाव 'एमटीएनएल जीपीआरएस' असे  लिहा व क्लिक करा.
  • उपयोगकर्त्याचे नाव  व पासवर्ड  रिक्त  ठेऊन नेक्स्ट बटणावर क्लिक करा.
  • फोन नंबरच्या रकान्यात  '*९९#' असे  टाईप करुन नेक्स्ट बटणावर क्लिक करा.
  • आता  डेस्कटाँपवर  'क्रिएट ए शॉर्टकट'  दिसल्यानंतर ' फिनिश' या बटणावर क्लिक करा.

ब्ल्यू-टूथच्या माध्यमातून मोबाईल बरोबर संगणकाची  (पीसीची) जोडणी. 

  • आपल्या संगणकाची व मोबाईलची  ब्ल्यू-टूथ चालू करा.
  • आपल्या संगणकाच्या 'ब्ल्यू-टूथ विझार्ड' मध्ये जा.
  • आपला संगणक ब्ल्यू-टूथच्या माध्यमातून मोबाईल बरोबर जोडा.
  • ते जोडले जाताच, आपल्याला  'डायल अप कनेक्शन विंडो' दिसेल.
  • फोन नंबरच्या रकान्यात  '*९९#' असे टाईप करा.
  • उपयोगकर्त्याचे नाव व पासवर्ड रिक्त ठेवा.
  • इंटरनेट एक्सेस करण्यासाठी 'डायल'बटणावर क्लिक करा.
 

 

 

 

 

 

लोकल संदेश -५० पैसे , राष्ट्रीय रु. १/- व आंतरराष्ट्रिय रु. ५/- ग्राहक या दिवशी कितीहि संदेश पाठ्वु शकतात  अधिक माहितीसाठी क्लिक करा.