आपण राष्ट्रीय ग्राहक पसंत रजिस्टर मध्ये आपल्या नंबरची नोंदणी केल्यास आपणास टेलिमार्केटींग कंपनीकडून येणारे अनावश्यक कॉल्स व संदेश (एसएमएस) येणे बंद होईल.
व्होंईस कॉलच्या माध्यमातून |
आपण खालील श्रेणीमधून संदेश प्राप्त करण्यासाठी आपल्या पसंतीनुसार नोंदणी करु शकता. : • पूर्णप्रकारे बंद श्रेणी (कोणताही टेलिमार्केटींग कॉल किंवा संदेश मिळणार नाही.) • काही प्रमाणात येणारे कॉल / संदेश बंद करणारी श्रेणी यामध्ये आपणास खालील विकल्पातून आवश्यक विकल्प निवडता येतील. विकल्प:
1. बैंकिग / विमा / वित्तिय उत्पादने / क्रेडिट कार्ड
2. रियल इस्टेट 3. शिक्षण 4. आरोग्य 5. ग्राहकोपयोगी वस्तू व ओटोमोबाइल्स 6. दळणवळण संचार / प्रसारण / मनोरंजन / माहिती तंत्रज्ञान 7. पर्यटन व विश्रामगृह |
---|---|
आपल्या पसंतीनुसार नोंदणी करण्यासाठी / पसंती बदलण्यासाठी / नोंदणी रद्द करण्यासाठी १९०९ वर कॉल करा . | |
संदेशाच्या (एसएमएसच्या) माध्यमातून | |
• आपल्या पसंतीनुसार नोंदणी करण्यासाठी ,"START‹option(s)› " हा एसएमएस १९०९ वर पाठवा. उदहारणर्थ 'Real State' च्या विकल्पासाठी पुढीलप्रमाणे "START 2" असे टाईप करुन १९०९ वर एसएमएस पाठवा.
• पसंतीमध्ये बदल करण्यासाठी, दिलेल्या विकल्पांना रद्द करण्यासाठी “STOP‹option(s)›" असा एसएमएस व नवीन विकल्प घेण्यासाठी “START‹option(s)›” असा एसएमएस १९०९ वर पाठवा. • नोंदणी रद्द करण्यासाठी “STOP” असा एसएमएस १९०९ वर पाठवा. • ग्राहक एकाच वेळी अनेक विकल्प निवडू शकतात. उदहारणार्थ विकल्प 'शिक्षण' व 'आरोग्य' कडून आपणास एसएमएस हवा असेल तर “START 3,4” असा एसएमएस १९०९ वर पाठवा. • वाणिज्यिक व्यापारासेवा विषयी एसएमएस पूर्णपणे बंद करण्यासाठी “START 0 ” असा एसएमएस १९०९ वर पाठवा. |
- टोल फ्री नंबर १९०९ डायल करा;
- या १९०९ वर एसएमएस पाठवा.
- एसएमएस खाली प्रमाणे करावा.
“COMP TEL NO XXXXXXXXXX, dd/mm/yy, Time hh:mm”
येथे XXXXXXXXXX म्हणजे आपणास प्राप्त होणा-या अनावश्यक टेलिफोन/एसएमएसचा क्रमांक दर्शवितो.
आपल्या तक्रारीची नोंद करून त्याची स्वीकृती म्हणून एमटीएनएल द्वारा एसएमएस पाठवला जाईल.
- एसएमएस खाली प्रमाणे करावा.
• अनावश्यक व्यापारविषयक माहिती उपलब्ध झाल्यावर ३ दिवसाच्या आत आपण त्याची तक्रार नोंद करणे आवश्यक आहे.