एमटीएनएलची डाटा सेंटर सर्विस
होम
एमटीएनएलच्या डाटा सेंटरची निर्मिती आयआयटी द्वारा केली आहे. हे डाटा सेंटर विश्वातील सर्वात गतिमान इंटरकनेक्शन फॅब्रिक आहे. हे डाटा सेंटर वेगवेगळया प्रकारच्या विस्तृत सेवा देण्याचा प्रस्ताव देते.
एमटीएनएलला अतिशय अभिमान वाटतो की भारतीय उद्योग जगताचे ते एक विश्वासू दळणवळण (कम्यूनिकेशन) भागीदार असून विकासाची आव्हाने पार करण्यासाठी त्यांना मदत करतात. आम्ही तुम्हाला व्यापार विषयक दळणवळण (कम्यूनिकेशन) सेवेची संपूर्ण श्रेणी उपलब्ध करून दिली आहे - डाटा, व्होंईस आणि मॅनेज्ड सेवा. आम्ही ग्राहकाच्या विशिष्ठ गरजेनुसार सेवा उपलब्ध करून देतो. आम्ही उच्च श्रेणीची डाटा सेंटर सेवा देण्यासाठी बांधील आहोत. एमटीएनएलचे डाटा सेंटर हे नेटवर्कच्या निरनिराळ्या माहिती व्यवस्था आणि डेन्स संगणक व्यवस्था आणि इंटरकनेक्टेड घटक यांचा कणा आहे.
एमटीएनएल गेली काही दशके दळणवळण (कम्यूनिकेशन) या क्षेत्रात नवनवीन सेवा आणि सुविधा मुंबई व दिल्ली मध्ये देऊ करत आहेत, ज्यासाठी एमटीएनएल, डाटा सेंटरचा उपयोग करून त्यांचे नेटवर्क वाढवून ग्राहकांना निश्चित तंत्रज्ञान विषयक प्रश्नांचे उत्तर देते. डाटा सेंटर ची योजना व तिचा आराखडा, विस्तार ही ब्रॉडबॅंड विभागाची निर्मिती आहे. मूळच्या तंत्रज्ञानामध्ये मुख्यतः अनेक जलद रचना असून त्यांच्या मदतीने कोणतेही डाटा सेंटर, कमीतकमी विजेचा वापर उद्योगांमध्ये, अपूर्व तंत्रज्ञान वापरून प्रचंड डाटा सेंटरचे कार्य समाविष्ट करते आणि नेक्स्ट जनरेशन डाटा सेंटरच्या गरजा व क्लाऊड कॉम्प्यूटिंग वातावरणास उपयुक्त ठरते.
एमटीएनएल नेक्स्ट जनरेशन डाटा सेंटर सेवांपासून मुख्य सेवांची श्रेणी देऊ करते (वेब -होस्टिंग, आयपी टिव्ही , व्हिडिओ-ऑन-डिमांड ), ते जास्त गुंतागुंतीच्या आयटी व्हर्च्युअलायझेशन सेवां वापरून व्हर्च्युअल मशीन्स, वित्तीय संगणकीय सॉफ्टवेअर, स्टॉक-मार्केट बॅकअप, इंटरप्रायझेस आयटी उपयोजन (एप्लिकेशन) आणि रिमोट आयटी प्रक्रिया (प्रोसेसिंग). मुंबईस्थित डाटा सेंटर शहरातील जवळजवळ सर्व कंपन्या व उद्योग समूह यांना जोडते. शहराचे मानक असलेले हे डाटा सेंटर नामांकित असून व्यावसायिक निर्णायक आयटी-गियर सहजपणे पूर्ण आयटी सेवांचे आऊटसोर्सिंग करते.
व्यावसायिक योजना:-
एमटीएनएल त्यांच्या ग्राहकांना डाटा सेंटरच्या विविध सेवां मोठ्या प्रमाणात देऊ करते. सर्विस लेव्हल अग्रीमेंट व आवश्यकतेनुसार या सेवेचे मॅनेज्ड व अनमॅमनेज्ड असे वर्गीकरण केलेले आहे. आंतरराष्ट्रीय निकषानुसार (टीआयए ९४२) डाटा सेंटरची संरचना केलेली आहे. जलद सेवा, रिमोट बॅकअप आणि अखंड सेवा पुराविण्यासाठीच्या सुविधांनी परिपूर्ण असे हे डाटा सेंटर शहराच्या विविध भागामध्ये उपलब्ध आहे॰
डाटा सेंटरची प्रमुख वैशिष्ष्ट्ये :-
- आयआयटी मुंबई संशोधक समूहाने संशोधित केलेली जगातील सर्वात जलद आंतरजोडणी रचना (वेगवान इंटरकनेक्ट फॅब्रिक) .
- भारतातील अत्यंत वेगवान बॅकबोन नेटवर्क द्वारे संपूर्ण जगाशी सर्वोत्तम जोडणी (कनेक्टिव्हीटी)
- फायबर व कॉपर केबलचा समावेश असलेल्या एमटीएनएल च्या समर्पित जोडणीच्या (डेडीकेटेड बॅकबोन) सहाय्याने ग्राहकांसाठी सर्वोत्तम जोडणी.
- अखंड विद्युत पुरवठा, अग्नी सुरक्षा, वातानुकुलीत व्यवस्था, स्विचिंग, मेमरी व कुशल प्रशासन या सुविधायुक्त परिपूर्ण संचालित असे डाटा सेंटर.
- प्रथमच विविध स्तरावरील डाटा बॅकअपची सुविधा.
- अद्ययावत सुरक्षा उपलब्ध असलेली स्वयंपूर्ण यंत्रणा.
आमच्याबद्दल
आधारभूत संरचना (इन्फ्रास्ट्रक्चर)
ही डाटा सेन्टर्स उद्योगधंद्याच्या मापकांशी जुळवून घेतात आणि त्यांची अशी उभारणी केली आहे कि ती कोणत्याही आपत्तीत उदा; नैसर्गिक, मानवनिर्मित, प्रासंगिक आपत्तीजनक किंवा इतर प्रतिकूल परिस्थितीवर मात करतात.
भौतिक
- सुरक्षित एक्सेस.
- भौगोलिक विभागीय सुरक्षितता.
- अग्निरोधक डीसी कक्ष.
- दूरस्थ पद्धतीने नियंत्रण, घटनांचे मुद्रण (रेकॉर्डींग).
- इंटरनेटसाठी फायरवॉल.
- मालकी हक्क सुरक्षेचा वापर.
- जल प्रतिबंधक, अग्निरोधक डीसी कक्ष.
शीतलीकरण
- नियंत्रित पर्यायी शीतलीकरण योजना.
- तापमान संदर्भात इन एसआयटीयू मोज मापणीचा पर्याय.
- तापमान २२ डिग्री से. व आर्द्रता ५०% राखले जाते.
बहुस्तरीय पॉवर मदत
- अखंड वीज पुरवठा.
- बॅटरी बॅकअप
नेटवर्क मदत
- सब -१ मायक्रोसेकंद स्विचिंग फॅब्रिक अतिवेगाने पूर्ववत (फास्ट टर्न अराउंड)
- नैसर्गिक मल्टीकास्ट मदत. (नॅचरल मल्टीकास्ट)
- १ जीबीपीएस आणि १० जीबीपीएस लाइन कार्ड आधारित.
- क्लाउड सेवा आधारित.
डाटा सेंटर तर्फे खालील सेवा दिल्या जातात :
मॅनेज्ड सेवा
- वित्तीय सेवा . कॉम्प्युटेशनल आणि वित्तिंय सॉफ्टवेयरसाठी आभासी(व्हर्च्युअल) मशीन्स.
- सॉफ्टवेयर सारखी सेवा.
- रिमोट आयटी प्रोसेसिंग.
- रिमोट बॅकअप.
- व्हीडीओ -ऑन-डिमांड
- एमटीएनएल सेल्युलर नेटवर्क बरोबर एकत्रीकरण.
अनमॅनेज्ड सेवा
- स्वयंचलित बॅकअप.
- होस्टिंग सेवा.
- आयपी टिव्ही.
- वेबहोस्टिंग.
- करमणूकप्रधान सेवा.
संपर्क करा.
कोणत्याही अधिक माहितीकरता येथे संपर्क करा @ :- | ||
---|---|---|
महाव्यवस्थापक( आय टी), एमटीएनएल, मुंबई. | ||
ई-मेल :-[email protected] | ||
पत्ता :- ५ वा मजला , करी रोड्स टेलीफोन एक्सें. बिल्डींग. दत्त मंदीर मार्ग मुंबई ४०० ०१२ |