संचालित लीज्ड लाईन नेटवर्क (एमएलएलएन)

एमएलएलएन ही एक संचालित लीज्ड लाईन नेटवर्क व्यवस्था (सिस्टिम) आहे.  लीज्ड लाईन कनेक्टिव्हिटी देण्याकरीता अत्याधुनिक तांत्रिक उपकरणांबरोबर ती प्रस्तावित केली गेली आहे.  लीज्ड लाईन वरील प्रभावी नियंत्रण व अवलोकन याकरीता, प्रामुख्याने आधुनिक तांत्रिक उपकरणांसहीत एमएलएलएनची रचना केली गेली आहे.  ज्यामुळे कमी वेळ लागतो व सर्किटसच्या क्षमतेत वाढ होते, आणि पर्यायाने ग्राहकांना अधिक समाधानकारक सेवा मिळते. सदर डाटा सर्किट मुख्यता ६४ केबीपीएस ते २०४८ केबीपीएसच्या दरम्यान कार्य करते. एमएलएलएन नेटवर्क मध्ये प्रचलित पीसीएम मक्स व ग्राहकाकडील मॉडेमच्या ऐवजी अत्याधुनिक (वर्सेटाईल) मक्स व त्याचे नेटवर्क टर्मिनेटींग युनिट प्रस्थापित केले जाते. 

एमएलएलएन मध्ये प्रामुख्याने डिजिटल क्रॉस कनेक्ट (डीएक्ससी), वर्सेटाईल मक्स (व्ही मक्स), नेटवर्क टर्मिनेटींग युनिट (एनटीयू) व नेटवर्क मॅनेजमेंट सिस्टीमचा समावेश केला गेला आहे. 'रूट फेल्युअर' या प्रकारच्या दोषावर उपाय म्हणून डिएक्सी व व्हीमक्सच्या दरम्यान असलेल्या 'फायबर' कनेक्टिव्हिटी सोबत पर्यायी रुटिंग सुविधा उपलब्ध केलेली आहे. अंततः 'व्हीमक्सची' ग्राहकाच्या ठिकाणी (कस्टमर प्रिमायसेस ) असलेल्या एनटीयुशी जोडणी कॉपर पेअरच्या माध्यमाने होते. 

या सर्वाच्या प्रभावी नियंत्रण व अवलोकनाकरिता सुयोग्य अश्या केंद्रस्थानी 'एन एम एस' प्रस्थापित केलेले आहे. एनटीयु चे संपूर्ण संचालन सदर  'एन एम एस' द्वारा केले जाते. ग्राहकाच्या मागणीनुसार ६४ केबीपीएस व त्या पुढील अधिक वेगवेगळ्या गतीकरिता एनटीयु कार्यान्वित (प्रोग्रामेबल) केले जातात. अश्या प्रकारे वेगवेगळ्या गतीकरिता 'एकच' मॉडेम (मॉडेम बदलण्याची गरज नाही) वापरता येते. एनटीयु २३० एसी व्होल्टवर चालविले जातात.

एमएलएलएनची वैशिष्टे   

  • लीज्ड लाईन नेटवर्कचे नियंत्रण व व्यवस्था.
  • ग्राहकांच्या मागणीनुसार बँडविड्थची व्यवस्था.
  • ग्राहकांकडून तक्रार नोंदविण्याची प्रतिक्षा न करता पूर्णता सक्रियपणे देखभाल. 
  • डिएक्ससी पर्यंतची ई -१ कनेक्टीविटी चेक करण्याकरिता (स्वयंचलीत) सॉफ्टवेअर लूप व एनटीयुशी कनेक्टेड कॉपर पेअर चेक करण्याकरिता व्हीमक्स सॉफ्टवेअर लूपची व्यवस्था.
  • कोणत्याही रुट दोषांच्या बाबतीत पर्यायी रुटिंग        
  • विश्लेषण/ग्राहकांकरीता तात्पुरता प्रदर्शन रिपोर्ट बनविणे.  

ग्राहकांचा लाभ 

  • ग्राहकांच्या आवश्यकतेनुसार बँडविड्थ व्यवस्था  (६४  केबीपीएस ते  २०४८ केबीपीएस पर्यंत)
  • मोडेम्सच्या किंमतीची बचत. एमटीएनएल द्वारा एमटीयूची व्यवस्था केली जाते.
  • पूर्व सक्रिय देखभाल.

एमएलएलएन मूल्य आकारणी तक्ता 

 एनटीयू

  • सुरक्षा ठेव रक्कम - शून्य ( २३.०२.२००६ पासून प्रभावी)