alt

पी सी ओ कसा मिऴवाल

 एसटीडी/आयएसडी/ स्थानिक पीसीओ जोडणी(कनेक्शन) खालील प्रमाणे दिले जाते.  

  •  एसटीडी/आइएसडी व स्थानिक पीसीओसाठी विहित नमून्यातिल अर्ज आपणास नि:शुल्क दिले जातात.  पीसीओचे अर्ज ग्राहकांनी ग्राहक सेवा केंद्रात जमा करावेत.   
  •  दि. ०१.०९.२००६ पासून स्थानिक पीसीओसाठी आवश्यक सुरक्षा ठेव कमी करुन रु. ५००/- केली आहे.  स्थानिक पीसीओसाठी व्यक्तीगत सुरक्षा ठेव रु. ५००/- व एसटीडी/आयएसडी पीसीओसाठी  रु. २०००/- रोख किंवा डिमांड ड्राफ्ट स्वरुपात जमा केल्यावर पीसीओ दिले जातात.  वरील ठेव जमा केल्यावर आपला पीसीओ मंजूर करुन त्याच वेळी काऊंटर वर डिमांड नोट/कार्यादेश बनवला जातो.        
  • पीसीओ बूथची व्यवस्था पीसीओ धारकास करावी लागेल.    
  •  एसटीडी/आयएसडी अथवा स्थानिक पीसीओ चा अर्ज जमा करते वेळी अर्जासोबत खालील कागदपत्रे (दस्तावेज) जोडावेत  

(आवेदक अर्जदारानी स्वत: प्रमाणित केलेल्या स्वतःच्या छायाचित्रबरोबर बरोबर खालील  कागदपत्रांच्या  प्रती (त्याच्या मूळ प्रतिसहित)  जमा करमे आवश्यक आहे.  फोटो कॉपी सत्यापित केल्यावर मूळ कागदपत्रे (दस्तावेज) अर्जदारास परत केले जातील.   

     (अ)  ओळखीचा पुरावा म्हणून खालील दस्तावेजांपैकी  कोणताही एक दस्तावेज प्रस्तुत करावा.  

          १.  मतदार ओळखपत्र 

          २.  वाहन चालक परवाना

          ३.  आयकर विभागाने दिलेले पॅन कार्ड

          ४.  पारपत्र (पासपोर्ट)

          ५.  शिधापत्रिका (रेशनकार्ड)  

       (ब) अर्जदाराची सही त्यांच्या बँकेतुन प्रमाणित करुन घेणे आवश्यक आहे. (प्रमाणिकरणाची मूळ प्रत आवश्यक ) 

  • देयक (बिलिंग) कामकाज पध्दतीनुसार लेखाधिकारी (ए ओ टी आर ) सुरक्षा ठेव जमा राशीची छाननी करुन निश्चित करतील॰     
  • फ्रेंचाइजी बरोबर पीसीओ कराराची आवश्यकता  नाही.  अर्जदारास अर्जासोबत जोडलेल्या विहित नमून्यात एक 'अंडरटेकींग' देणे आवश्यक आहे व त्यासाठी स्टँम्प पेपरची आवश्यकता नाही. 
  • ग्राहक सेवा केंद्रामधील लिपिक ग्राहकांनी जमा केलेल्या कागद पत्रांची छाननी करून प्रमाणित करतील व प्रमाणित केलेल्या कागद पत्रांवर आपली सही, नाव, स्टाफ नंबर व पदनाम नमूद करतील॰  त्यानंतर काऊंटर वरील व्यक्ती ग्राहकांकडून आवश्यक सुरक्षा ठेव रोख/ड्राफ्ट स्वरुपात घेऊन कार्यादेश बनवेल.  रोख स्वरुपात/डिमांड ड्राफ्टनी मिळालेली रक्कम लेखाधिकारी/नगद यांना पाठवली जाईल.  दस्तावेज अपूर्ण असल्यास ग्राहकांस विनम्रपणे सांगण्यात येईल. 
  • एकाच ठिकाणी एकापेक्षा जास्त पीसीओ संस्थापित करण्यासाठी काही बंधन नाही.  एकाच ठिकाणी अधिक पीसीओ उपलब्ध केले जाऊ शकतात.  दूरसंचार विभागाच्या निर्देशानुसार जर एकाच ठिकाणी १० पीसीओ किंवा त्यापेक्षा अधिक पीसीओंची एकत्रित नोंदणी केली असेल तर त्याची माहिती क्षेत्रिय महाव्यवस्थापक व दक्षता विभागास देणे आवश्यक आहे. 
  • वर सांगितलेल्या पध्दतीने प्रत्येक स्थानिक पीसीओ साठी रु. ५००/- व एसटीडी पीसीओ साठी रु. २०००/- सुरक्षा ठेव केल्यावर एका पेक्षा अधिक पीसीओ दिले जातील.  अधिक पीसीओसाठी वर्तमान एसटीडी स्थानिक पीसीओ पासून मिळणारे उत्पन्न तपासण्याची आवश्यकता नाही. 
  • कार्यादेश जारी केल्यानंतर त्या क्षेत्रातील उप मंड अभियंता (बाह्य) त्या परिसरात भेट देऊन पीसीओ संस्थापन करण्याची जागा लोकांना सुविधाजनक आहे की नाही याची पाहणी करतील व एसटीडी पीसीओसाठी 'टीईसी' द्वारा निर्धारीत केलेल्या चार्जिंग उपकरणाच्या उपलब्धतेसंबंधी माहिती देतील व त्यानंतर पीसीओसाठी सीसीबी पीसीओ उपकरण संस्थापित केले जाईल.  

शुल्क विवरण (टेरिफ)

पूर्ण भारतामध्ये सीसीबी पीसीओ

 

क्रमांक विवरण     भाडे/अवधि
१. स्थानिक लँडलाईन कॉल, एमटीएनएल स्थानिक गरुड़ व डॉल्फिन आणि एमटीएनएल,दिल्ली लैंडलाइन/गरुड़ वर केले जाणारे कॉल ६० सेकेंद  (  १/३/२०१२ पासून लागु)
२. स्थानिक अन्य मोबाईल कॉल ६० सेकेंद  (  १/३/२०१२ पासून लागु)
३. परिमंड क्षेत्राबाहेरचे कॉल   (Intra circle)  
  < ५० किमी पर्यंत  ६० सेकेंद
  ५०-१०० किमी पर्यंत * ६० सेकेंद
  १०० किमी पर्यंत * ६० सेकेंद
४. परिमंड क्षेत्रातील कॉलसाठी  (Inter Circle) * ६० सेकेंद
५. आयएसडी परवानगी नाही  
६. सुलभता (एक्सेसिबीलिटी ) परिमंडळा बाहेर व परिमंडळामध्दोये व महाराट्रात मोबाईल कॉल्स ० लेवलनी केले जाऊ शकतील.  जवळपास क्षेत्रामध्ये (*५० किमी पर्यंत) किंवा एमटीएनएल दिल्लीचे   कॉल ९५ लेवल लावू शकता. 
रेट/पल्स रु.१( सेवा करासहित )
८. सुरक्षा जमा ठेव रु.१०००/-
९. भाडे  स्थानिक भाडे
१०. सीपीईचा प्रकार सीसीबी/बाह्य डिसकनेक्टर 
११. देयकाचा कालावधि (बिल सायकल ) प्रति पंधरवडा
१२. कमीतकमी गारंटी रु.१५०/पंधरा दिवस (दि.०१/०६/१० पासून)
१३. कमिशन  
  • ४००० कॉल्स/महिना पर्यंत : ३५%
  • >४००० कॉल्स/महिना : ४५% ( फक्त ४००० कॉल्स पेक्षा अधिक कॉल केले असतील तर) सेवा कर समायोजित केल्यावर कमिशन दिले जाईल.   
१४. सीसीबी मध्ये सुधार (मोंडिफिकेशन) स्थानिक पीसीओ मधून या योजनेमध्ये येणा-या कॉलना सीसीबी उपकरण/कॉल डिसक नेक्टर मध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. 
१५. ओसीबी, इडब्ल्यूएसडी,५इएसएस नवीन एक्सचेंज कॅटेगिरी बनवली जाऊ शकते.
१६. फेटेक्स -१५० नवीन कॅटेगरी बनवली जाऊ शकते या योजनेमध्ये येणा-या स्थानिक पीसीओचे नंबर बदलले जातील.    

एसटीडी/आइएसडी पीसीओ करिता शुल्क विवरण (टेरिफ)

क्रमांक विवरण भाडे
१. सुरक्षा जमा ठेव रु.२०००/-(सुरवातीस एक महिन्याच्या बिला इतकी रक्कम घेतली जाईल )
२. कमीतकमीगॅरंटी रु.२५०/- प्रति महिना (.दि.०१/०६/१० पासून )
३. पल्सचाकालावधि   नवी दिल्ली येथे केलेला  कॉल स्थानिक कॉल समजला जातो.    भारत/विश्वामध्ये कोणत्याही ठिकाणी डायल केलेल्या स्टेशनच्या अनुसार हा कालावधि वेगवेगळा असेल.   
४. प्रति पल्स शुल्क (रेट )  रु.१.२०/पल्स (प्रति ६० सेकेंद.)
५. टर्मिनल इंस्ट्रूमेंट कॉल लॉगर
६. कमिशन ५००० कॉल पर्यंत - ३०%
५००० कॉल पेक्षा जास्त कॉलसाठी  - ४०%
(दोन्ही साठी दिले जाणारे कमिशन मासिक कॉलच्या आधारे असेल)

एक्टिव /स्थानिक पीसीओ करीता शुल्क विवरण (टेरिफ)

 

क्रमांक विवरण भाडे
१. सुरक्षा जमा ठेव रु.५००/-
२. कमीतकमी  गारंटी रु.१५०/- प्रति महिना (दि. .०१/०६/१० पासून)
३. पल्स कालावधि ९० सेकेंद (दि.१६/०१/२०१० पासून)
४. प्रति पल्स शुल्क (रेट ) रु. १.००/-
५. कमिशन प्रति कॉल ३००० कॉल पर्यंत - ४०%
३००० कॉल नंतर - ५०%

शारिरिक विकलांग पीसीओ धारकास भाडे

क्रमांक विवरण भाडे
१. सुरक्षा जमा ठेव शुन्य
२. कमीतकमी गारंटी रु.१००/- दरमहा
३. पल्स कालावधि ९० सेकेंद (दि. .१६/०१/२०१०)
४. प्रति पल्ससाठी शुल्क  रु. १.००/-
५. प्रति कॉल कमिशन सर्व कॉलना ५०%  (महिन्या भरात केल्या जाणा-या कॉलच्या संख्येप्रमाणे कमिशन दिले जाईल ) 

 

 

अधिक पीसीओ घेणे

पीसीओ धारक

  •  पीसीओ धारकास संस्थापन शुल्क व सुरक्षा जमा ठेव भरण्याची आवश्यकता नाही॰  
  •  अधिक पीसीओ साठी कोणतीही कमीतकमी गॅरंटी राशी घेतली जाणार नाही.  
  • हे पीसीओ स्थानिक, एचपीसीओ, अखिल भारतीय सीसीबी पीसीओ अथवा एसटीडी/आयएसडी पीसीओ असतील व वर्तमान पीसीओ बरोबर संलग्न असतील.    
  • जे पीसीओ ग्राहक ही सुविधा घेऊ इच्छितात अशा ग्राहकांना ही  सुविधा दिली जाते.  या पीसीओची कोणतीही देयक (बिल) थकबाकी असता कामा नये. 
  • हे अतिरिक्त पीसीओ मुख्य पीसीओशी संलग्न राहतील व हे मुख्य पीसीओ जोपर्यंत कार्यरत असतील तोपर्यंत अतिरीक्त पीसीओ कार्य करतील व मुख्य पीसीओ परत केल्यावर कनेक्शन बंद केले जाईल. 
  • कमिशनचा प्रकार व बिलींग कालावधि यामध्ये काहीही बदल नाही. 
  • कोणत्याही प्रकारची थकबाकी असणा-या पीसीओकरीता ही योजना लागू नाही.

 

शारिरिक विकलांग पीसीओ धारकास भाडे

   

 

  • शारिरीक विकलांग व्यक्तीच्या स्थानिक पीसीओसाठी कमिशन दि.०१.०९.२००७ पासून लागू केले आहे. 
  • शारिरीक विकलांग व्यक्तीच्या अतिरिक्त पीसीओसाठी सुद्धा सवलत लागू आहे॰    
  • वर्तमान पीसीओ असताना अतिरिक्त पीसीओ घेण्यासाठी ( सुरक्षा ठेव न घेता ) वर्तमान पीसीओचे उत्पन्न व कॉल मर्यादा विचारात घेतली जात नाही (अन्य स्थानिक पीसीओ धारका प्रमाणे) 
  • एचपीसीओ साठी नादुरुस्त (बिघाड़ झालेले) उपकरण निशु:ल्क बदलले जाईल.   
  • दि.१०.०६.२००५ पासून लागू.  

 

 

कमिशन संरचना

एसटीडी/एसडी पीसीओ धारक (होल्डर)

 

क्रमांक उत्पादित वस्तुचे नाव विवरण
१. एमटीएनएल फोन कार्ड (व्हीसीसी)  रु.५०००/- किंवा त्यापेक्षा जास्तीच्या खरेदीवर ७.२% 
२. रिचार्ज कूपन रु.५०००/- किंवा त्यापेक्षा जास्तीच्या खरेदीवर ५.२%  

 

 

स्थानिक पीसीओ धारक (होल्डर)

  •  शारिरीक विकलांग पीसीओ धारकास ४० पैसे कमिशन दिले जाईल.  
  •  कॉल मूल्य फक्त रु..१/- असेल॰  ( मुंबई एमटीएनएल यूनिट साठी ).
  •  सार्वजनिक टेलिफोनचा फलक (बोर्ड) लावणे आवश्यक आहे.